LADKA BHAU YOJANA 2024 माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या भावांसाठी देखील महत्त्वाची घोषणा केलेली आहे 17 जुलै रोजी मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये होते पांडुरंगाची पूजा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात या योजने संदर्भात माहिती दिलेली होती पण या योजनेची अंमलबजावणी कशी करण्यात येईल त्याच्यासाठी कोण पात्र असेल याबद्दल अर्थसंकल्पात कोणतेही कल्पना देण्यात आलेली नव्हती पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत माहिती दिलेली आहे लाडक्या भावासाठी असलेली ही योजना नक्की आहे काय त्याच्यासाठी कोण पात्र असणारे त्याचा फॉर्म कुठे भरायचा या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत
Table of Contents
LADKA BHAU YOJANA 2024 योजना नक्की काय –
सुरुवातीला ही योजना नक्की काय आहे ते समजून घेऊयात मुख्यमंत्री या योजनेला लाडक्या भावांसाठी असलेली योजना म्हणत असले तरीसुद्धा या योजनेचे अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे ठेवण्यात आलेले अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडताना या योजनेची घोषणा घोषणा केलेली होती तेव्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थी तरुणाला प्रति महिना दहा हजार रुपये देण्यात येतील तसेच ही योजना फक्त पदवीधर विद्यार्थ्यांसाठी असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता या योजनेचा एकूण आवाका जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आता बारावी आयटीआय पदवीधर डिप्लोमा मास्टर करणाऱ्या किंवा केलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी सरकारने तब्बल 5500 कोटी रुपयांची सुद्धा तरतूद केलेली आहे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्ये बेरोजगार युवकांना आकर्षित करण्यासाठी पहिली नोकरी पक्की या नावाने अप्रेटीशिप जाहीर केलेली होती याच्यामध्ये देखील 25 वर्षाखालील तरुणांना एक लाख रुपये म्हणजे महिन्याला 8500 देण्याचे त्यांनी घोषणा केली होती त्याच योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणलेली आहे आता या योजनेसाठी कोण पात्र आहे याच्यासाठी कुठे नोंदणी करायची हे जाणून घेऊयात
LADKA BHAU YOJANA 2024 योजनेचा लाभ कोणाला –
LADKA BHAU YOJANA 2024 तर बघा या योजनेचा लाभ 18 ते 35 वयोगटातील महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या आणि बारावी आयटीआय डिप्लोमा डिग्री मास्टर्स केलेल्या आणि नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे आणि यासाठी जे प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाईट वरती नोंदणी करावी असं सांगण्यात आलेले आहे. याच वेबसाईट वरती स्टार्टर्स उद्योग किंवा आयटी कंपन्यास ज्यांना रोजगाराची गरज आहे त्या नोंदणी करत असतात त्यानंतर प्रशिक्षणार्थाच्या आवडीनुसार आणि रोजगाराच्या उपलब्धतेनुसार त्या त्या युवकांना प्रशिक्षण मिळणारे दरवर्षी जवळपास दहा लाख प्रशिक्षणार्थींना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे या योजनेचा कालावधी फक्त सहा महिन्यांचा असणारे आधी अशी चर्चा होती की ही योजना वर्षभरासाठी लागू असेल पण आता सरकारने जे परिपत्रक काढलेला आहे त्याच्यानुसार ही योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू असणार आहे आणि त्यांनी ते स्पष्ट केले. याशिवाय सरकार जे विद्या वेतन देणार आहे ते थेट प्रशिक्षणार्थींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यामुळे या योजनेमध्ये कोणतेही पद्धतीचं लिकेज होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे
LADKA BHAU YOJANA 2024 – APPLY HERE
LADKA BHAU YOJANA 2024 महत्वाचा मुद्दा –
आता अजून एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे ते म्हणजे या योजनेअंतर्गत कोणकोणत्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी काम करू शकणारे तर ज्या कंपनीमध्ये त्या युवकाला प्रशिक्षण घ्यायचा आहे ती कंपनी महाराष्ट्रामध्ये कार्यरत असली पाहिजे संबंधित कंपनीने कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वेबसाईट वरती नोंदणी केलेली असली पाहिजे ती कंपनी किंवा उद्योग किमान तीन वर्ष जुना असावा आणि या योजनेअंतर्गत असलेल्या कंपन्यांनी ईपीएफ ईएसआयसी जीएसटी सर्टिफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन याच्यामध्ये नोंदणी केलेली असावी आणि अशाच कंपन्यांमध्ये या योजनेअंतर्गत त्या त्या तरुणांना प्रशिक्षण घेता येणारे आहे. LADKA BHAU YOJANA 2024
LADKA BHAU YOJANA 2024 – APPLY HERE
LADKA BHAU YOJANA 2024 विद्यावेतन व अटी –
LADKA BHAU YOJANA 2024 सर्वच विद्यार्थ्यांना १०,००० सरसकट विद्या वेतन मिळणार आहे का आणि कोणती कागदपत्र लागू शकतात तर बघा तसं नाहीये फक्त डिग्री आणि मास्टर्स केलेल्या विद्यार्थ्यांनाच १०,००० विद्यावेतन दिल जाणारे आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना फक्त ८,००० मिळणारेत आणि बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त ६,००० प्रति महिना विद्यावेतन मिळणारे आणि यासाठी म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी महाराष्ट्राचा आदिवासी असणे गरजेचे म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आणि तो त्याच्याकडे वैध असं आधार कार्ड पाहिजे आणि ते आधार कार्ड बँक खात्याशी त्यांनी अटॅच केलेलं असणं गरजेचं आहे. मग हे सर्व कागदपत्र घेऊन https://rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाईट वरती नोंदणी केली की मग त्या युवकाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आता अनेकांना असेही वाटत असेल की मी सतराव्या वर्षी बारावी उत्तीर्ण झालेलो आहे तर मग मला या योजनेचा लाभ मिळेल का? तर त्याचे उत्तर नाही असं आहे कारण की सरकारने त्यांच्या परिपत्रकात स्पष्ट केलेला आहे की बारावी उत्तीर्ण आणि 18 ते 35 असा वयोगट त्यांनी तिथे मेन्शन केलेला आहे पण येणाऱ्या काळामध्ये सरकार या पात्रतेमध्ये बदल करू शकतो असे देखील सांगितले जाते. प्रशिक्षणाच्या काळामध्ये कंपनी पगार देणार का असं सुद्धा प्रश्न अनेकांचा असू शकतो तर तसं नाहीये विद्यावेतन जे आहे जे सरकारकडून दिले जाणारे तितकच विद्या वेतन त्या त्या प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे कंपनी कोणत्याही पद्धतीची रक्कम किंवा लाभ त्या प्रशिक्षणार्थींना देणार नाहीये फक्त विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार ते विद्या वेतन जे आहे ते दिले जाणारे आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न काही जण म्हणतील की मी बारावी झालेलो आहे आता मी डिग्रीला ऍडमिशन घेतलेला आहे किंवा आता मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेला आहे तर मग मला बारावी साठीचा जो काही टायपिंग मिळणार आहे तो मिळणार की डिप्लोमा च्या विद्या वेतनानुसार 8000 रुपये मिळणार की डिग्रीच्या हिशोबाने १०,००० मिळणार तर एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारने जे परिपत्रक काढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेंशन केले आहे विद्यावेतन डिप्लोमा पास झालेला असेल तर ८,००० विद्या वेतन आणि जर का डिग्री झालेली असेल तर १०,००० विद्या वेतन असणार आहे म्हणजे जर का तुम्ही डिप्लोमाच्या किंवा डिग्रीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला असाल तर तुम्हाला त्या पद्धतीचा विद्यावेतन मिळणार नाहीये डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतरच त्या प्रमाणामध्ये तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे.
LADKA BHAU YOJANA 2024 कोणत्या कंपनी मध्ये विद्यावेतन मिळणार –
LADKA BHAU YOJANA 2024 आता काही जणांना अजून असा प्रश्न पडलेला असेल की कोणत्याही कंपनीमध्ये काम करून किंवा फक्त तिथे नोंदणी करून विद्यावेतन मिळवता येऊ शकतं का? तर सरकारच जे परिपत्रक आहे त्याच्यानुसार एखाद्या कंपनीला या योजनेअंतर्गत जर का नोंदणी करायची असेल तर ती कंपनी किमान तीन वर्ष जुनी असली पाहिजे त्या कंपनीचं ईपीएफआयसी जीएसटी सर्टिफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन डीपीआयटी याच्यामध्ये नोंदणी असली पाहिजे सरकारचा हेतू किती चांगला असेल म्हणजे सरकार चांगलं हेतूनेच प्रत्येक योजना आणत असतं पण आता सरकारच्या या योजनेमुळे अनेक बंद पडलेल्या कंपन्या देखील पुन्हा सक्रिय होऊ शकतात असं सांगितलं जातंय विद्यार्थ्यांची फक्त नोंदणी करून पैसे उचलण्याचे गैरप्रकार देखील घडू शकतात त्याच्यामुळे सरकार देखील या योजनेचा गैरफायदा घेतला जाणार नाही याची काळजी घेऊ शकत याशिवाय सरकारने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण घेण्यासाठी कंपन्यांसाठीचा जो क्रायटेरिया दिला आहे त्या क्रायटेरियात बसणाऱ्या अनेक कंपन्या पुणे मुंबई नाशिक या राज्यातील गोल्डन ट्रँगल मध्येच आहे त्याच्यामुळे प्रशिक्षणार्थींना जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अनेकांना या शहरांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी यावं लागणारे सहा महिन्यांसाठी करायला अशावेळी गाव खेड्यातील प्रशिक्षणार्थींना या शहरांमध्ये राहण्याचा खाण्याचा हा जो खर्च असणार आहे तो परवडणार आहे का असा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी जर का आपण विचारात घेतल्या तर सरकार येणाऱ्या काळामध्ये या योजनेमध्ये आवश्यक ते बदल करेल असा देखील अनेकांना विश्वास आहे तशी अपेक्षा आहे कारण की लाडकी बहीण योजनेच्या वेळेस सुद्धा जेव्हा अडचणी येत आहेत असं लक्षात आलं होतं तर त्या क्रायटेरिया मध्ये काही बदल करण्यात आले होते अटी शिथिल करण्यात आलेल्या होत्या करा.
LADKA BHAU YOJANA 2024 – APPLY HERE
तर ही आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले होते त्याची उत्तर आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता जर काही माहिती तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व शेअर
अशाच प्रकारची विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WHATSAPP ग्रुप मध्ये सहभागी व्हा.
3 thoughts on “LADKA BHAU YOJANA 2024 | लाडका भाऊ योजना अपडेट | कोणाला किती मानधन मिळणार ?”